डिप्लोमा इन सेक्स!!!
होय, हे खरे आहे. आता आपण या विषयातही चक्क पदवी घेऊ शकणार आहोत! यासाठी अट फक्त एकच आहे तुम्ही सोळाव्या वरीसाच्या धोक्याबाहेर आलेले असावे. इतर नियम असे आहेत की, हा कोर्स चालू असतांना तुम्हांला शाळेबाहेर पडता येणार नाही, होस्टेलमध्येच राहावे लागेल. एका रुममध्ये फक्त एकाच विद्यार्थी/विद्यार्थिनीला राहता येईल. मग या डिप्लोमा अंतर्गत तुम्हांला प्रेम कसं करायचं? चांगला प्रियकर वा प्रेयसी कसं व्हायचं? सुरक्षित आणि आनंददायीही संबंध कसे प्रस्थापित करायचे याचे पाठ आणि धडेच शिकावे लागतील. गिरवावे लागतील. या अभ्यासक्रमावर लेखी, तोंडी अन् ‘प्रात्यक्षिक’ परीक्षाही असेल!
या शाळेच्या जाहिरातीमध्ये वापरण्यात आलेला किसिंग सीन मोठ्या चर्चेचा आणि काही समाजधुरीणांच्या पोटदुखीचा विषय बनला असून त्यांनी या जाहिरातीवर बंदी आणलेली आहे. वाद उत्पन्न केला की आपोआप प्रसिद्धी मिळते, या नायायानुअसार सर्वकाही चालेले आहे असे वाटते. मुळात लैंगिक शिक्षण कसे द्वे याचे गुऱ्हाळ चालूच असून भलताच संभ्रम निर्माण केला जातो. या सर्व चर्चेला फाटा देऊन या कोर्सची धुमधडाक्यात सुरुवात केली गेली आहे. ज्यांना असे वाटत असेल की आपले काहीतरी शिकायचे राहून गेले किंवा करायचे राहून गेले त्यांना येथे निर्विवाद प्रवेश घेऊन ती हौस पूर्ण करता येईल. हा कोर्स यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर तुम्हांला पदवी देऊन पुरस्कृत केले जाईल. ही सर्व माहिती चटपटीत किंवा मनोरंजक वाटत असली तरी काही प्रश्ने अनुत्तरीतच राहतात...
येथे नोकरी करण्यासाठी कोणती योग्यता पडताळली जाईल किंवा या इंटरनॅशनल स्कूलमध्ये व्हॅकन्सी आहे काय? जास्तीत जास्त वयाची अट काय? कितीही वर्षे नापास होऊन ‘प्रॅक्टीकल’चा अनुभव घेता येईल काय? या कोर्सचे प्रमाणपत्र सादर करून कोठे नोकरी मिळण्याची शाश्वती देता येईल काय? जे वयस्क लोक प्रवेश घेऊ इच्छितात त्यांना काही डिस्काऊंट दिला जाईला काय? इथे काही चॉईस राहणार आहे का? की मिळेल त्या भिडूसोबत प्रात्यक्षिक करायचे? शिवाय आपलेच प्रात्यक्षिक आपल्याला शूट करता येईल काय? ते इतरांना दाखवून शाबासकी किंवा वाहवा मिळविता येईल काय? जागतिक स्पर्धा वगैरे भरवणार काय? इ. इ.
ही बातमी जाहीर होताच ‘डेली मेल’ वर प्रतिक्रियांचा असा पाऊस पडला!
असो.
आता तुम्ही म्हणाल हे काय भलतंच सांगता आहात. पण हे अगदी खरं आहे आहे महाराज! शिक्षणाची जागतिक राजधानी लंडनच्या परिसरात हे स्कूल सुरु झाले आहे. या कोर्ससाठी एका टर्मची फी एक लाख अकरा हजार पाचशे नऊ रुपये (फक्त) असून जेव्हा तुम्ही अॅडमिशन घ्याल तेव्हा तुम्हांला शैक्षणिक साहित्याचे वाटप केले जाईल. या इंटरनॅशनल स्कूलचा जास्तीत जास्त भर थेअरी पेक्षा प्रॅक्टिकल्सवर असणार आहे. असे स्कूलच्या स्वीडिश संचालिका ‘यिवा-मारिया’ यांनी कळविले आहे. व्हिएन्ना येथे हे ऑस्ट्रियन इंटरनॅशनल स्कूल सुरु झाले असून येथील प्रवेश दणक्यात सुरु झाल्याचे सांगण्यात येत आहे. शाळेच्या प्रवक्त्या मेलोडी किश्क यांनी ‘आमचे स्कूल नक्कीच यशस्वी होईल’ अशी ग्वाही दिलेली आहे.
चला, या निमित्ताने कितीतरी सहस्त्रके अंधारात चालणारा कारभार उजेडात येईल नव्हे शिकताही येनायची मुख्य सोय झाली. या कोर्समुळे लैंगिक शिक्षणाला चालना तर मिळाली! फक्त आता हे शिक्षण अधिक निकोप अन् शास्त्रीय कसे दिले जाईल ते पहायचे...
0 comments:
Post a Comment