पुरुषानं कसं सडेतोड असावं. मुळूमुळू करणं हा इतरांचा प्रांत. धडाकेबाजपणा हा पुरुषाचा मूळ गुणधर्म. तो त्यानं जपला पाहिजे अन् योग्यवेळी व्यक्त केलाही पाहिजे. मनात कुढत बसणे त्याचा पिंड नाहीच. जे वाटते, जे आवडते, जे पटते ते बोलून मोकळे होणे हाच खरा पुरुषार्थ. तसेच जे मनाविरुद्ध घडते, जे आवडले नाही अन् ज्यात आपले इप्सित साध्य होत नाही त्याचा प्रतिकार करणे, बिनतोडपणे त्याचा जाहीर लिलाव करणे व त्या विरुध्द आवाज उठविणे हाच पुरुषाचा धर्म असतो.
असो. इतकं सगळं लिहिण्याचं कारण म्हणजे काही पुरुष ताकाला जातात खरे पण भांडं लपविण्याचा प्रयत्न करतात. परंतु समोरची पार्टी महाचाणाक्ष असते. तिला सिक्थसेन्स नावाचा प्रकार अवगत असतो. केवळ नजरेच्या विभ्रमानुसार पुरुषाच्या मनातली खळबळ अन् तळमळ ती जाणू शकते. त्याला नेमकं काय ओकायचं आहे हे ती जाणतेच पण तसे न दाखवता त्या पार्टीलाही आपले सूप्त हेतू पुरुषाकडून पूर्ण करवून घ्यायचे असतात. मग ती त्याचा टाय पकडून त्याला कुत्र्यासारखे हिंडवित जाते. पुरुष बिचारा आता तरी समोरची पार्टी हो म्हणेल, नंतर तरी ती सगळं हवाली करेल या आशेवर खोटं खोटं प्रेमाचं नाटक करीत राहतो, आपल्या शरीरातील गर्मी अन् उर्मी दोघींनाही दाबत राहतो.
प्रेमळपणाचा आव आणणे हा पुरुषाचा डाव असून समोरच्या पार्टीला कधी एकदा चीतपट करून कुस्ती मारतोय हा त्यामागे मूळ हेतू असतो आणि यात गैर ते काहीच नाही. पुरुष निसर्ग नियमाला धरूनच वागत असतो. फक्त व्यक्ती तितक्या प्रकृति या न्यायाने त्यात भावभावनांचे मिश्रण म्हणा किंवा डिव्होशन म्हणा असे उपप्रकार घुसडून प्रेम व्यक्त केले जाते, निभावले जाते. खरा चेहरा त्याने झाकलेलाच असतो. मग ताकाला जाऊन आपलं भांडं लपवायचं कशासाठी? सरळ सांगून टाकायचं ना- ‘कभी मेरे साथ, कोई रात गुजार...’ समोरच्या पार्टीदेखत ‘इलू इलू’ करण्यात काय अर्थ आहे. ती जर हो म्हणाली तर ठीक, नाही तर नेक्स्ट!
जे निसर्गानं बहाल केलंय त्याचा बेधडक वापर करायला हवा. आडवळणाने जाऊन वेळ कशाला घालवायचा? फटाफट सांगून मोकळं व्हायचं- ‘मला तुझ्याकडून हेच अपेक्षित आहे, म्हणून मी तुझ्यावर प्रेम करणार आहे. बोल तुला मंजूर आहे की नाही?’ कदाचित समोरची पार्टी आपल्या श्रीमुखात भडकावून देईल. पण घाबरून जायचे कारण नाही. तिला जे वाटत असतं ना की दुसरा कुणी निष्काम प्रेम करणारा भेटेल, तर तो त्या पार्टीचा गोड गैरसमज असतो. फार फार तर दोन तीन महिने तो नवखा भिडू ‘दम’ काढेल, नंतर मात्र आपले मनोवांछित फल प्राप्त्यर्थम कसे होईल याचीच संधी शोधीत राहील. प्रेम केल्यानंतर ओघाने ‘चाळे’ येतातच. झुडपाआड लपून कुणी काही ‘सोज्ज्वळ’ प्रेमाच्या गुजगोष्टी करीत बसत नसतो. किंवा त्याला ‘एकांत’ का हवा असतो, हे समोरच्या पार्टीला कळत नाही असे समजणे चूक समजावे का म्हणून? जर तिलाही हे कळलेले असेल तर आपल्याला जे हवं ते बेधडक सांगून टाकायला कचरायचं का म्हणून?
‘पोरींना प्रेम करायला कारण लागतं तर मुलांना प्रेम करायला जागा लागते!’ ही उक्ती काही चुकीची नाही. निवांत, अंधाऱ्या, निर्जन जागा पोरींपेक्षा पोरांनाच जास्ती माहिती असतात, हे काय उगाच नाही. जंगलातल्या नवनव्या वाटा, खडकाळ आडोसे, दऱ्याखोऱ्या, अर्धवट लेण्या व गुहा, ओसाड मंदिरे, चिडीचूप माळराने अशी कितीतरी ठिकाणे पोरांच्या हिटलिस्टवर असतात ते का म्हणून?
म्हणूनच ‘प्रेमाला’ जाऊन कधीच भांडं लपवायचं नसतं. कारण आपला बहुमुल्य वेळ वाया घालवून उचंबळून येणाऱ्या निसर्गाला पुरुषानं का म्हणून कोंडून ठेवायचं?
मराठी गप्पा
Tuesday, March 6, 2012
Wednesday, February 22, 2012
व्यवसायातील प्रगतीसाठी नाविन्य व सर्जकता यांची गरज...
प्रिय मित्र-मैत्रिणींनो, व्यास क्रिएशन आयोजित ऑनलाईन निबंध लेखन स्पर्धेत सर्वोत्तम अकरा निबंधामध्ये माझ्या निबंधाची निवड झाली असून त्याची लिंक पुढील प्रमाणे आहे. लिंक ओपन करून त्यावर “like” करावे तसेच फेसबुक वरील आपल्या इतर मित्रमंडळींसाठी “share” करावे.
http://www.facebook.com/photo.php?fbid=240088092745006&set=a.183154511771698.47993.134202923333524&type=1&theater
मनापासून धन्यवाद!
निबंध पुढे दिलेला आहे...
व्यवसायातील प्रगतीसाठी नाविन्य व सर्जकता यांची गरज...
जुने ते सोने असे जरी म्हटले जात असले तरी नवे ते प्रत्येकाला हवेच असते हे विसरून कसे चालेल? तद्वत एखादा व्यवसाय नव्या रुपात दिसू लागला की ग्राहक आकृष्ट होतातच. कारण नाविन्याची ओढ प्रत्येकालाच असते. प्रगती या शब्दातच गती असल्याने व्यवसायाला, व्यापार उदिमाला किंवा कुठल्याही छोट्या मोठ्या धंद्याला ही गती नक्कीच प्रगती पथावर नेत असते. ही गती कोणती म्हणाल तर सर्जकतेची, नवनवीन कल्पना अमलांत आणण्याची, नव्या जमान्याची अपेक्षापूर्ती होऊ शकेल अशा नवीनतम गोष्टी अंगीकारून आपला व्यवसाय पेश करण्याची. व्यवसाय फलद्रूप तेव्हाच होईल जेव्हा तो गतिमान असेल, त्यात नविनतेची झाक असेल. थोडक्यात काय तर जुनी कात टाकून नवनवा सळाळता उत्साह अंगीकारला की व्यावसायिक प्रगती ही होणारच ठरली.
व्यवसाय कोणताही असो, त्यामध्ये कालानुरूप बदल करणे वा नाविन्याचा अंतर्भाव करणे हे क्रमप्राप्त असते. आजच्या सायबर युगात कोणतीही क्षणापूर्वीची कृती वा घटना नवी राहत नाही. क्षणात जुनी होते. काही सेकंदात अनेकांकडून पाहिली, अनुभवली जाते. त्यामुळे जो नवनवीन कल्पना लढवून आपला व्यवसाय जगापुढे घेऊन जाईल, नाविन्याच्या क्लृप्त्या योजून इतरांपुढे सादर करेल तोच स्पर्धेत टिकू शकतो हे त्रिवार सत्य आहे. काही उदाहरणावरून हे स्पष्ट करता येऊ शकेल-
साध्या किराणा दुकानाचं किंवा वाणसामानाच्या दुकानदारीचं उदाहरण सांगता येईल. पूर्वी कसं गावाच्या किंवा शहरातील ठराविक ठिकाणी उघडझाप करणाऱ्या उभ्या फळ्यांचं दार असलेलं हे वाण्याचं दुकान असे. तराजू काट्यात तोलून वाण सामान दिले जायचे. रद्दीच्या कागदात पुड्या बांधून माल विकला जाई. आज असं तेलकट मेणकट दुकान शहरात दिसत तर नाहीच, खेड्यातही नाही. या व्यवसायात कितीतरी नवनवे बदल होत जाऊन आजची मॉलसंस्कृती उभी राहिली आहे. तराजू जाऊन इलेक्ट्रिक वेट मशिन्स आल्या. त्यामुळे ग्राहकाला अचूक वजनाचा माल मिळू लागला. वर्तमानपत्राऐवजी कॅरीबॅग आल्या, पाऊच आले, पॅकिंगची नवी कला या व्यवसायाने आत्मसात केली. हे बदल वेळोवेळी अनुसरल्यामुळेच दुकानापासून मॉलपर्यंतची ही प्रगती शक्य झाली. ही सर्जकता वाखाणण्याजोगी आहे. स्वच्छता, टापटीप, सुटसुटीतपणा असणे हे मुलभूत नियम कुठल्याही व्यवसायाला लागू पडतातच. तरीही मॉलमध्ये असलेली भव्यदिव्यता अन् एकाच जागी सर्व किराणा माल, गृहोपयोगी वस्तू, विविध साधने, कपडेलत्ते उपलब्ध करून देण्याची नाविन्यता प्रशंसनीय आहे. आज जगणेही वेगवान झाले आहे. कुटुंबासाठी लागणाऱ्या सर्वच वस्तू दहा दुकाने फिरून खरेदी करत बसण्यात वेळ घालविण्यापेक्षा मॉलमधील ही ‘वनस्टॉप शॉपिंग’ अल्पावधीत लोकप्रिय झाल्याचे दिसून येते. आपला माल लक्ष वेधून घेईल असा प्रदर्शित करण्यासाठी योजिलेला चकचकीतपणा ग्राहकाला नक्कीच भावतो, भुरळ पाडतो. आत आलेल्या ग्राहकाची आपुलकीयुक्त चौकशी व मार्गदर्शन हे देखील हा मॉलचा व्यवसाय प्रगती पथावर नेण्याचा राजमार्ग ठरला आहे. आता जर पूर्वीसारखे जुनाट वाणसामानाचे दुकान कोणी उघण्याचे धाडस केले तर तिकडे कुत्रेही फिरकणार नाही अशी परिस्थिती आलीय!
ग्राहकांच्या आपल्या व्यवसायाकडून काय अपेक्षा आहेत, त्यांना कोणते बदल अपेक्षित आहेत याचा अभ्यास करून त्वरित त्याप्रमाणे नवीनता आपल्या व्यवसायात आणणे महत्वाचे ठरते. पूर्वी चौकात फटकूरं टाकून गिऱ्हाईकांची वाट पाहणारे नाभिक बंधू आपल्या परंपरागत व्यवसायात ग्राहकांना जे हवे आहेत ते बदल स्वीकारून त्यांनी आजमितीला दिसणारे मेन्स पार्लर, हेअर कटिंग सलून या प्रकारांत आपला व्यवसाय प्रगतीपथावर नेऊन ठेवला आहे. काही दशकांपूर्वीचा नाभिक व्यवसाय आता कितीतरी नाविन्य घेऊन समोर येत गेला आहे. त्यांनी योजिलेली सर्जकताच या कामी महत्वाची ठरली आहे.
तीच गोष्ट पूर्वापार चालत आलेल्या इतर बारा बलुतेदारांच्या व्यवसायाचीसुद्धा आहेच. लोहार, चांभार, सुतार यांचे पारंपारिक व्यवसाय अडगळीत जाऊन त्यांनी नवखे रूप धारण केलेले दिसते. बदलत्या काळानुसार हे व्यवसाय देखील किती बदलत गेले ते लक्षात घेण्याजोगे आहे. लोहारकाम आता फॅब्रिकेशन वर्क्स म्हणून गणले जाते. त्यात अंतर्भूत झालेल्या अनेक नवनव्या मशीन्समुळे खूपच सफाईदारपणा, अचूकपणा आलेला आढळून येतो. चर्मकारांचा व्यवसाय देखील आता नवे रूप घेऊन आलेला आहे. पूर्वी पायाचे माप देऊन जोडा शिवायला टाकावा लागे. आज हव्या त्या रंगाचे, हव्या त्या मापाचे जोडे घालून पाहता येतात, लगेच खरेदीदेखील करता येतात. पूर्वी फक्त चामड्याच्या असणाऱ्या वहाणा आज वेगवेगळ्या मटेरियल्स पासून बनविलेल्या आढळतात. ग्राहकाला सुखदायी होईल, आरामदायी वाटेल अशा चपलांची-बुटांची निर्मिती करून हा व्यवसाय वाढत गेला. सुतारकामाचे सुद्धा असेच आधुनिकीकरण झाल्याने तो व्यवसायसुद्धा नव्या रुपात प्रगती करीत आहे. पॅटर्नमेकिंग, इंटेरिअर डेकोरेटर, फर्निचर वर्क्स अशा नावांनी तो ओळखला जातो. फर्निचर बनविण्यासाठी नवनव्या मशिन्स व आधुनिक हत्यारांचा वापर सुरु झाल्याने कामामध्ये अचूक रेखीवता आणि वेगाने काम पूर्ण करून मिळण्याची हमी यांमुळे पारंपारिक सुतारकाम जवळजवळ कमीच झाले आहे.
वैद्यकीय व्यवसायाची भरभराट देखील त्यातील नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञान स्वीकारल्यानेच होत आलीय. त्यामुळेच आपला भारतीय वैद्यकीय व्यवसाय ‘मेडिकल टुरिझम’साठी जगभरात वाखाणला जातो. परदेशी नागरिकांना माफक दरात उत्तम सेवा पुरविली गेल्यामुळे या व्यवसायाची जागतिक स्तरावर प्रशंसा केली जात आहे. देशाबाहेरून आलेल्या पेशंट्स लोकांना आपले भारतीय आदरातिथ्य भावते. योग्य ट्रीटमेंट, यथायोग्य दरात चांगल्या उपचारांची खात्री यांमुळेच ही प्रगती झालीय. परंपरागत चालत आलेल्या वैद्यकीय व्यवसायात कितीतरी छोटे मोठे बदल होऊन आजचा प्रगत तंत्रज्ञानाने व्याप्त व्यवसाय समोर आलेला आहे. बिनटाक्याच्या कित्येक शस्त्रक्रिया आज केल्या जातात. मोठमोठी ऑपरेशन्स आता कमी वेळेत अन् कमी त्रासाची होतात. नवनवीन शस्त्रक्रियांच्या पद्धतीचा वापर अंगीकारला जातो. नवीन उपचार पद्धती शोधून त्यानुरूप चिकित्सा-उपचार केले जातात. नवसंजीवनी प्राप्त व्हावी तसे स्वीकारार्ह बदल अनुसरून आजची प्रगती झाली आहे. म्हणजेच वैद्यकीय व्यवसायात सर्जकता व नाविन्य यांचा संगम झाल्यामुळेच ही प्रशंसनीय प्रगती झालेली आहे.
प्रकाशन व्यवसाय देखील आता जुनी वल्कले टाकून नाविण्याने बहरलेला दिसतो. सुबक व देखणी प्रिंटींग करता येऊ लागली आहे. नवनवे बदल स्वीकारून ई-पुस्तके, ई-प्रकाशन असे नाविन्य जपत हा व्यवसाय जागतिक स्वरुपात प्रकट झाला आहे. ई-बुक्स देखील आता खिशात मावू शकतील इतकी लहान आकारात उपलब्ध केली जातात. स्क्रीनवर स्क्रोल करून पाने उलटणे, हव्या त्या पानावर क्षणात जाता येणे, फोन्ट साईज वाचण्योग्य अशी कमीजास्त करता येणे इ.इ. कितीतरी नाविन्यपूर्ण प्रयोग आज प्रकाशन व्यवसायाच्या प्रगतीच्या पथ्यावर पडले आहेत. आजच्या तरुणाईची नेमकी नाडी पकडून अनेक प्रकाशक आता ऑनलाईन पुस्तके प्रकाशित करण्याची सर्जकता दाखवितात. त्यामुळे वाचक वर्ग नक्कीच वाढला आहे. प्रकाशन व्यवसायाला पूर्वापार चालत आलेली छापील साहित्य संकल्पना बदलून दृश्य पुस्तकरचना करण्याची गरज अंगीकारणे अधिक फायद्याचे ठरणार आहे.
कुठल्याही व्यवसायाची माहिती लोकांपर्यंत, ग्राहकांपर्यंत पोचविणे आजकाल खूपच महत्वाचे आहे. त्याचसाठी जाहिरातबाजी हा नवा व्यवसाय उदयास आला. अशी एकही गोष्ट वा वस्तू नाही जिची जाहिरात होत नाही. आपल्या व्यवसायाला पूरक ठरेल म्हणून आपल्या व्यवसायातील नाविन्याची जाहिरात वारंवार केली जाते. जाहिरातबाजीचा व्यवसायसुद्धा असाच फोफावला आहे, प्रगती साधून वाढला आहे. काही दशकांपूर्वी भिंती रंगवून जाहिरात केली जायची. त्यात अमुलाग्र बदल होत गेले. नवनवीन शोधांचा यशस्वी वापर करून वेगवेगळी प्रसारमाध्यमे, फ्लेक्स, होर्डिंग्ज, साईनबोर्ड, पाल्मप्लेट्स, मोबाईलवर एसएम्एस देऊन किंवा इंटरनेटच्या माध्यमातून जाहिरातबाजी केली जाते. दररोज त्यात नाविन्याची भरच पडते आहे. इंटरनेटच्या मार्गाने कशाचीही जाहिरात एका सेकंदात जगाच्या या कोपऱ्यापासून त्या कोपऱ्यात पोहचू शकते. या व्यवसायातील नवीनता टिकून आहे म्हणूनच ही प्रगती साधली जात आहे.
म्हणूनच प्रत्येक व्यावसायिकाने आपल्या व्यवसायात नवनवे बदल घडवून त्याचा यशस्वी अन् प्रभावी वापर केला तर व्यावसायिक प्रगती निश्चितच होईल यात दुमत असण्याचे कारण नाही.

Tuesday, February 14, 2012
गुलाब फक्त देणंच ...
जी जी त्याला भेटली तिला तिला तो गुलाब देत गेला. ती काही का म्हणेना पण त्याचं गुलाब देणं काही चुकलं नाही. साध्यासुध्या दिसणाऱ्या मुलींनाही त्याने आखीव रेखीव अन् आकर्षक गुलाबपुष्प सादर केले होते. त्यावेळी त्या सामान्य मुलीच्या डोळ्यांतील आश्चर्ययुक्त भाव वाचणे त्याला भारी आवडायचे. तिच्या मनी ध्यानी नसतांना मिळालेली ही सुंदर भेट तिला स्मितहास्य करायला भाग पाडायची. तसं तिच्या मनात हे असं काही घडेल याची पुसटशी शंकाही हजर नसायची. अशा अचानक वेळी त्यानं गुलाब दिला की नकळत किंवा स्त्रीसुलभ पुष्पप्रेमापोटी तिचा हात तो गुलाब घेण्यास आपोआप उद्युक्त व्हायचा. त्याचं निरागस हास्य, गुलाब पेश करण्याची आर्जवी अदा अन् डोळ्यांतला निर्मळपणा पाहून ती आपसूक त्याचा गुलाब स्वीकारायची.
अशा प्रकारे त्याने किमान चाळीसेक पोरींना गुलाब देऊन उपकृत केले होते. अर्थात त्यांनी त्याला त्याची परतफेड करावी अशी काही त्याची अपेक्षा नव्हती बरं का. प्रत्येकीने हसून गुलाबाचं स्वागत केलं मात्र काहीही टिप्पणी करण्यास त्या सरसावल्या नाही. किंबहुना त्यालाही गुलाब द्यावा अशी कृती कुणीच आमलात आणली नव्हती. एकाही मुलीला असं वाटलं नव्हतं की आपणही त्याला गुलाब द्यावा. तो मोळीभर गुलाबांची खैरात जरी करून गेला होता, तरी त्याची झोळी मात्र रिकामीच राहिली होती.
ते कॉलेजची अखेरचे वर्ष होते. डिग्री हातात पडताच सगळेच नोकरीपाठी धावणार होते. पोरीही आपापल्या उद्योगात डुबून जाणार होत्या. पुन्हा या मुली भेटण्याची शक्यताच नव्हती. त्या दिसूही शकणार नव्हत्या. येत्या काही महिन्यांत अनेकींचे हात पिवळे देखील होतील. आपण सगळ्याजणींशी गोड वागलो, एकीलाही दुखावलं नाही वा त्यांनी दाखविलेल्या विश्वासाला तडा जाईल असे वागलो नाही, कित्येकिंच्या घरी तासनतास गप्पा झोडीत बसलो. त्यांना हसवलं, दुःख विसरायला मदत केली. त्यांनीही हसत खेळत आपल्याला मैत्रीची साथ दिली. त्या प्रत्येकीप्रति आदरभाव व्यक्त करायलाच पाहिजे. असा विचार करून शेवटची भेटवस्तू याअर्थी पाकळीच नाही तर आख्खे फूल देण्याचा मानस त्याने रचला होता तसेच प्रत्यक्षात आणलाही होता.
त्यांच्या लेखी तो एक चांगला निर्हेतुक मित्र, अडीअडचणी समजावून घेणारा स्नेही, योग्य सल्ला देणारा हितचिंतक होता. त्याचा सभ्यपणा त्यांना भावायचा. त्या त्याची अपुलकीयुक्त चौकशी करायच्या. कुठे रस्त्यात भेटला तर त्याच्याकडे पाहून न पाहिल्यासारखं करणं त्यांना जमत नसे. त्या आवर्जून थांबत अन् त्याच्याशी भर रस्त्यात बोलून घेत. आता कॉलेजनंतर तोही आपल्याला भेटेल की नाही ही शंकाच असल्याने त्यांनी विनाविलंब त्याचे गुलाब स्वीकारले. त्यांच्या तर मनात कुठला किंतु नव्हताच याच्याही नव्हता. प्रत्येक मैत्रीण गुलाब घेणार याची त्याला खात्रीच होती. त्यामुळे खिशाला चाट बसली तरी हा मौका सोडायचा नाही. हरेकीचा गुलाब पुष्पाने सत्कार करायचा असे त्याने ठरवलेच होते. त्याप्रमाणे एक चांगला दिवस योजून सर्व मैत्रिणींना गुलाबी गुलाब देऊन टाकले. रात्री निश्चिंत पडून तो हिशोब करण्यात गुंग झाला...
अशा अनेक रात्री गेल्या. तो कामाधामाला लागला. नोकरी मिळाल्यावर त्याच्या घरच्यांनी त्याचे दोनाचे चार करायची घाई केली. झालं, तो नवरदेव म्हणून बोहल्यावर चढला. यशावकाश संसारातही रममाण होऊन गेला. बघता बघता वर्ष संपत आलं.
आणि एका दिवशी सकाळ पासून त्याचा फोन खणखणत राहिला. जिला जिला त्यानं निःशंकभावनेने गुलाब दिला होता, त्या प्रत्येकीचा आवर्जून फोन येत होता. काय चाललेय, कसे चालेलय, तू कुठे, मी कुठे, यजमान काय करतात वगैरे वगैरे अनौपचारिक गप्पा करता करता कधी दिवस मावळला त्यालाही कळले नाही. त्याची बायको मोठ्या कौतुकाने त्यांच्या या फोनभेटीचा उत्सव न्याहाळीत होती. फोन संपला की तो त्याच्या बायकोला फोन केलेल्या मुलीचा स्वभाव, तिचं दिसणं, तिचा आवडता पेहराव, तिचे केस, वेणी, टिकल्यांचे प्रकार, वेशभूषेचे प्रकार, तिचे डोळे, चेहऱ्यावरील मुरमांची संख्या किंवा डाग, व्रण, हनुवटीवरील तीळ, नखांची लांबी, त्यावरील नक्षीकाम, तिच्या हातातल्या घड्याळाचा पट्टा, तुटलेला एखादा काटा, रंग उडालेली डायल, तिच्या अंगठा शिवलेल्या चपला, टाचा घासलेले शूज, तिचं वागणं, तिचं बोलणं... सगळं सगळं काही समरसून सांगत सुटायचा. त्याचं इतकं निरीक्षण असेल तेही प्रत्येक मैत्रीणीचं? तिला आश्चर्य वाटत होतं. मोठ्ठा आ करून ती त्याचं सर्वकाही ऐकत राहिली होती. अनेक शंका-कुशंका तिच्या मनात येत नसतील तरच नवल!
त्याचं तिच्या चेहऱ्यावर उमटणाऱ्या त्रासिक भावाकडे लक्ष होतंच कुठे? तिच्या आश्चर्ययुक्त नजरेच्या खोल तळी उमटलेले भयभीत तरंग त्याला जाणवू शकत नव्हते, कळणारही नव्हते कारण त्या प्रत्येकीने फोन संपविताना त्याला शुभेच्छा देत म्हटलं होतं – ‘हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे!!!’

Monday, February 13, 2012
प्रेमात पुरुष मागासलेला
‘धुंवाधार’ प्रेम करणं पुरुषाला अजूनही उत्तमप्रकारे जमत नाहीच. प्रेम असं केलं पाहिजे की ज्याची मनावरही अन् तनावरही खोल जखम व्हायला पाहिजे. ती ठसठसणारी किंवा भळभळत राहणारी असली पाहिजे. तेच खरे प्रेम. नाहीतर आज प्रेम केलं, उद्या तिनं झिडकारलं, परवा ती दुसऱ्याचबरोबर नांदू लागली हे काही पुरुषाच्या दृष्टीने चांगले घडत नाहीये बरं का! आजकाल कौटुंबिक न्यायालयात प्रलंबित राहणारी असंख्य डिव्होर्सची प्रकरणे कशाची द्योतके आहेत? प्रेम करण्यात पुरुष खूपच मागासलेला आहे असेच म्हणावे लागेल. जो एका स्त्रीला हवं ते प्रेम भरभरून देऊ शकत नाही तो कुठेतरी कमी पडतो आहे हे निश्चित.
पूर्वी असं नव्हतं का? होतं. परंतु त्याकाळी स्त्रीची उघड बोलण्याची शक्ती जागृत झालेली नव्हती. स्त्री शक्ती वगैरे फंडा त्यावेळी अस्तित्वात नव्हता. मूग गिळून गप्प बसणे हा सर्वमान्य तोडगा होता. स्त्रीची तृप्ती कशात आहे हे तिलाच स्वतःला कळत नव्हते, जरी कळाले तरी ते मिळवायचे कसे यावर मोठी बंधने होती. आज परिस्थिती बदलली आहे. मुक्ततेचे वारे घेऊन ललना अधिकच समंजस तितक्याच टोकदार झालेल्या आहेत. मानव प्राणी म्हणून आपल्यालाही हवे ते मिळविण्याचा अधिकार असल्याचे समुपदेशाकापुढे ठासून सांगण्यात आजची स्त्री तरबेज झाली आहे. त्यामुळे अधिकाधिक विवाह टिकवून धरण्यापेक्षा जुने मोडून नवे ते हवे हवे म्हणत विभक्त होण्याचा घाट पुरुषापेक्षा स्त्रीकडूनच अधिक घातला जातो. वैवाहिक जीवनात कुठली उणीव राहिली हे पुरुषाला अजूनही कळलेले नसते. तो बापुडा माझं काय चुकलं? असंच घोकीत राहतो. तिची चीडचीड तो थंडावू शकत नाही हेच त्यामागील कारण होय. कितीही हाल अपेष्टा काबाडकष्ट सोसण्याची तिची तयारी असते जेव्हा तो तिच्यावर मुक्तहस्ते प्रेमाचा वर्षाव करू शकेल, जेव्हा ती त्याच्याकडून मिळणाऱ्या तुडुंब प्रेमाने भारीत होऊन बेहोशीची मजा लुटून निश्चिंत राहत असेल अन् जेव्हा तो तिला पुरुनही उरत असेल!
म्हणूनच आजचा भारतीय पुरुष प्रेम करण्याकामी फारच मागासलेला आहे असे खेद पूर्वक म्हणावे लागते. एका सर्वेक्षणानुसार भारतातील फक्त दहाच टक्के स्त्रियांना सुखाची जाणीव झालेली असते. इतर नव्वद टक्के स्त्रिया अजूनही अनभिज्ञ राहून ढगात जाणाऱ्या गोळ्या झेलीत आयुष्य कंठतात. त्यांना खरे प्रेम कधीच मिळालेले नसते, त्यामुळे त्या कंबरदुखी, पाठदुखी, चिडचिड, त्रागा, राग, द्वेष, अनुत्साह, नैराश्य अशी लक्षणे व्यक्त करीत राहतात. यामागे अतृप्तता हे प्रमुख कारण असले तरी पुरुष त्याकडे सोईस्कर दुर्लक्ष करून माझ्यात काहीच कमी नाही असे खोटे खोटे भासवीत जातो. खरे तर स्त्रीची सुख\पूर्ती कशात आहे हे काही त्याला कळलेले नसतेच. त्याचा कार्यभाग संपला की तो दूर होणेच पसंद करतो. शिखरावर चढाई करतांना मध्यातूनच माघार घेतल्याने अस्मानसे गिरे सारखी अवस्था अधुऱ्या स्त्रीची होऊन जाते. तिची तगमग दुसरा पुरुष मिळविण्याच्या मार्गाने नकळत होत जाते. आणि यात गैर ते काहीच नाही. तू नही तो और सही असा कायदा स्त्रीसुद्धा पुरुषाला सुनावू लागली आहे. आजकाल प्रत्येक ऑफिसमधून झडणारी अफेअर्सची चर्चासत्रे कशाचे लक्षण आहे? भारतात एकही कार्यालय असे नाही की जिथे अशा घरवाले बाहरवाले प्रकार नसतो. मग आता खरी पुरुषाने स्वतःतील प्रेम करण्याबाबतचे न्यूनत्व धुंडाळण्याची वेळ आलेली आहे.
आंधळा कारभार...
‘भारतीय पुरुष सध्या अंधारात चाचपडत जगतो आहे, त्याला अजूनही खरे कामविश्व कळलेले नाही. याबाबत त्याचे प्रबोधन करण्याची गरज निर्माण झालेली आहे...’ हे काही माझे वैयक्तिक मत नव्हे, गेल्या काही महिन्यात (डिसें.२०११) सकाळ वृत्तपत्राच्या सप्तरंग पुरवणीत ‘लैंगिक शिक्षण देणारं कुटुंब’ या लेख-मालिकेत लेखक हुजूर- राजन खान या ‘गहन’ विषयाबद्दल सडेतोड भाष्य करतांना दिसत होते.
लैंगिकतेबद्दल आपली रूढ झालेली छुपी पद्धत त्यांना बिलकुल आवडली नाही. सेक्स हा विषय जीवनाचे अविभाज्य ‘अंग’ असतांना त्याबाबत कमालीची गुप्तता पाळणे, त्याबद्दल जाहीरपणे लिहिणे-बोलणे, त्याविषयीचे मतप्रदर्शन त्याज्य समजणे फार चुकीचे आहे, असे ते म्हणतात. एका सर्वेक्षणानुसार भारतातील केवळ दहा टक्के स्त्रियांनाच कामतृप्तीचा अनुभव येत असतो. इतरजणी मुग गिळून गप्प राहतात. काहींना तर तृप्ती म्हणजे काय हे आयुष्यभर उमजलेले नसते. केवळ एका यांत्रिक क्रियेचा भाग म्हणून त्या लैंगिक संबंध पार पडतात. ज्यांना हे जाणवते पण पुरुषाकडून मिळत नाही त्या मात्र ‘आहे त्यात समाधान’ मानत संसार कडेला लावतात. खरे तर या अंधारातल्या क्रिया उजेडात आणून निदान नवरा-बायकांनी तरी चर्चेला घ्याव्यात, त्यातील अधिक-उणे व्यक्त करावे, जाणून घ्यावे, त्रुटी दूर करून निश्चिंत व्हावं असाच त्या लेख मालिकेमागील उद्देश होता. कुटुंबात या विषयी उघड चर्चा व्हावी असे त्यांचे प्रांजळ मत होते. हे सद्य परिस्थितीत शक्य नसले तरी काळाची गरज म्हणून येत्या काही दशकांत चर्चेला घेतले गेले तर त्यात वावगे असे काहीच समजू नये.
उदाहरणादाखल काही रुढी-परंपरा उधृक्त कराव्याशा वाटतात.-
काही आदिवासी जमातींमध्ये आपल्याला आवडलेल्या मुलीला मुलगा पळवून नेतो. त्यावेळी ते दोघेच स्वतःचे जीवन स्वतःच कंठत असतात. एकटेच राहतात, शिकार करतात, खातात, पितात, मौजमजा करतात. त्या दोघांचे पटले (अनेक अर्थांनी) तर ती मुलगी त्याच्या सोबत राहते. अन्यथा तिला त्या मुलाला अव्हेरण्याचा अधिकार असतो. म्हणजे तिला पाहिजे ते सुख मिळवून देण्यासाठी तो तिला पळवून नेण्याआधीच तयारीत असतो. जोवर त्याला स्वतःविषयी दृढ विश्वास वाटत नाही तोवर तो पोरगी पळवून नेण्याची भाषाच करू शकणार नसतो. अन् त्याच्यात योग्य ‘धमक’ असेल तरच ती त्याचसोबत राहण्याचा हट्ट धरते. तो जर तिला ‘सुखा’त ठेवू शकला नाही तर त्याला दुसरी मुलगी शोधावी लागते. इतके होऊनही त्या जमातीत अशा अनेक ठिकाणी फिरून आलेल्या मुलींना व्हर्जिनिटीचा प्रश्नांकित शिक्का मारुन टाळले जात नाही हे विशेष. आजच्या हायटेक पिढीत हा मुद्दा जास्त चर्चिला जात असला तरी पुरुषाला ‘त्या’तलं काय येतं, ‘त्या’वेळी तो कसं वागतो? असे प्रश्न विचारात घेतले जातच नाहीत. खरे तर त्याच्याच वयाच्या एखाद्या मध्यस्थाला पुढे घालून त्याचं लैंगिक वर्तन जाणून घेणे अतिमहत्त्वाचे असते, जे की वधूपक्षाकडून सोईस्कररीत्या टाळले जाते.
काही जमातींतील मोठी माणसे आपल्या वयात आलेल्या मुलांना मुद्दामहून प्राण्यांचा समागम प्रत्यक्ष जागेवर जाऊन समजावून सांगतात. त्यामुळे त्यांना त्या क्रीयेविषयी अजिबात लाज वाटत नाही वा त्या गोष्टीचे दडपण येत नाही. शिवाय अशा क्रियेचा मोठीच माणसे परिचय करून देत असल्याने बाऊ करण्याचा प्रश्नच उद्भवत नसतो. प्रत्यक्ष क्रीडेच्यावेळी त्यांची लैंगिक भूक यथोचित शमत असेल यात शंका नसावी. आपण सुशिक्षित मात्र अशा दृश्यांपासून मुलांना चार हात दूर ठेवतो, ते वाईट कसे आहे याचे चरित्र गात राहतो आणि केवळ तेच म्हणजे जीवन नाही हेही बिंबवत जातो. खरे तर त्याच्याशिवाय जगणे पूर्ण होत नाही. परंतु आपल्या अशा दडपून टाकण्याच्या वृत्तीमुळे होतं काय की कुतूहलापोटी नको त्या मार्गाने स्त्री-पुरुष संबंधाची चित्रे वा ब्ल्यू फिल्म्स तरुणांकडून पाहिल्या जातात. त्यात दाखविलेला उत्तानपणा, भडकपणा अन् तासनतास चालणारा ‘डोंबारकी’चा प्रकार खरा वाटू लागतो. प्रत्यक्षात असे काहीच नसते. स्त्रीला तृप्ती मिळवून देणे ही वेगळीच ‘कामकला’ आहे. ती ‘अनुभवानेच’ शिकून घेण्याचा शाप आजच्या भारतीयाला मिळालेला आहे. स्त्रीच्या कामतृप्तीबद्दल योग्य ते मार्गदर्शन कोणीच करीत नाही. जे काही सांगितले जाते ते अतिशयोक्त किंवा अशास्त्रीय असे असते. मुळात हे लैंगिक संवेदनेचे ज्ञान पालकांनीच देणे क्रमप्राप्त असतांना ते कानावर हात ठेवतात, बाजूला होतात. ‘तू अन् तुझे लैंगिक जीवन. तुझे तूच निस्तर.’ असे म्हणत काखा वर करून मोकळे होतात. अशावेळी बाहेरच्या जगाकडून अयोग्य ज्ञान पदरात पाडून घेण्याकडे मुलांचा कल वाढतो. आणि ट्रिपलएक्स मध्ये दाखवतात तसेच प्रात्यक्षिक करायला गेल्यावर नववधू भडकणार नाही तर काय हो? कदाचित किंचाळत पळेलही किंवा नवऱ्याला काहीच ‘जमत’ नाही म्हणून माहेरी गेलेली थेट कोर्टातच भेटेल!
आणखी एक गोष्ट राजन खान यांनी नमूद केलीय की भारतीयांचे लग्न फारच उशिरा होते. पैसा ही बिनीची वस्तू बनल्याने अथवा करियर हा शब्द प्राधान्याने अमलात आणण्याच्या धडपडीपायी आजचा तरूण आपल्या तारुण्यसुलभ भावना अक्षरशः दडपून टाकीत चालला आहे. ज्यावेळी त्याचं करियर पार पडतं त्यावेळी त्याने आयुष्याची तीस वर्षे मोजलेली असतात अन् त्यामुळे ‘वयात आल्या’नंतरची पंधरा वर्षे सक्तीचे ब्रह्मचर्य (फार फार तर ‘आपला हात...’ असे व्रत) पाळलेले असते. रोज उफाळणार्यात लाटा थोपविलेल्या असतात, लैंगिक संवेदना गोठविण्याचा प्रयत्न केलेला असतो कारण असं काही अनैतिक करणं म्हणजे व्यभिचार होय, अशी व्याख्या त्याच्या डोक्यात फिट्ट रुतलेली असते. लग्नापूर्वी संबंध येऊ देऊच नये हा संस्कार वादाचा मुद्दा ठरावा, इतका पोकळ बनत चालला आहे. भारतीयाला कामक्षयाची व्याधी जडलीय हे कुणी मान्यच करायला कबूल नाहीत. आपला कार्यभाग उरकला की संपली क्रीडा असा पुरुषी वर्चस्वाचा मानदंड स्वीकारला गेला आहे. स्त्रीचे स्खलन झाले आहे की नाही, तिला या यांत्रिक क्रियेतून लैंगिक समाधान मिळाले आहे की नाही किंवा ती अशा अपूर्ण संबंधामुळे त्रासली आहे काय? याचे ना कधी चिंतन होते ना कधी विचारपूस केली जाते. वाढत्या वयामुळे येणारे शैथिल्य कोणीच रोखू शकत नसते. त्यावर मात कशी करायची याचे शास्त्र जाणून घेण्याऐवजी तरूण मुले व्हायेग्रा सारख्या धोकादायक गोळ्यांना बळी पडतात. हार्डकोरच्या लालसेपोटी स्त्रीवर प्रेमाचा वर्षाव करणे, तिच्या शृंगाराला दाद देणे, तिला समजून घेत यथास्थित परमोच्च बिंदू गाठून देणे हे साफ विसरत चालला आहे.
योग्य वयात लग्न झाले की तारुण्याचा उन्माद यशस्वीरित्या शमवता येतो. उशीर होत गेला की संवेदना बधीर होत जातात, उत्साह बोथट होत जातो. वयात आल्यावर जे हवं असतं, शरीराकडून ज्याची वारंवार विचारणा होत असते तेच तरुणांना मिळत नाही. मग ते त्यांना पटेल त्या वाटेने जात राहतात, चुकीच्या पद्धतीने भावना मोकळ्या करीत राहतात किंवा गैरमार्गाने भूक भागवित जातात. शास्त्रोक्त ज्ञानाची गरज असतांना काहीतरी ऐकीव गोष्टींवर विश्वास ठेऊन वागावे लागते, त्या अवैज्ञानिक कृती पडताळून पहाव्याशा वाटतात. मग जे चुकीचे आहे तेच बरोबर वाटून त्या पद्धतीचा अवलंब करीत वैवाहिक जीवन सुरु होते अन् काहीच अनुभव नसलेल्या ड्रायव्हरला अवघड घाट पार करण्यास सांगावे तशी गत त्या नवशिक्याची होऊन जाते. यावरून पाहिल्या रात्रीचा ‘गलीतगात्र’ अनुभव अनेकांना अजूनही जसाच्या तसा आठवू लागेल. शारीर ज्ञानाची गरज असतांना कोणतंही नवं जोडपं या महत्त्वाच्या विषयावर चर्चा करतांना आढळत नाहीत वा एखाद्या तज्ञाचा सल्ला घेत नाहीत. ‘ज्यांचं बेडवर जमतं त्यांचं उभ्या आयुष्यात चांगलं जमतं’ ही उक्ती तर प्रत्येकाला माहितीच असली पाहिजे.
पण आपल्या समाजाची शोकांतिका हीच की या अत्यावश्यक लैंगिकतेला अश्लीलतेच्या झापाखाली डालून ठेवले जात असते. कितीतरी लैंगिक समस्यांनी ग्रस्त असलेले पुरुष खरोखर ‘तसे’ नसतातच. फक्त त्यांचे वर्तन कुठेतरी चुकत आलेले असते. तसे पाहता आपण भारतीय लोक या विषयांत बहुत पारंगत होतो असे प्राचीन ग्रंथांवरून लक्षात येईल. खजुराहोची लेणी असो व वात्सायनातले संस्कृत श्लोक यावरून कोणेएके काळी आपला समाज कामक्रीडेत खूपच प्रगत होता असे म्हणता येईल. त्याकाळी आपले राजे महाराजेच नव्हे तर सामान्य पुरुषदेखील दोन-दोन तीन-तीन बायका करून ‘मजेत’ जगत होता. बहुपत्नीत्व त्यावेळी मान्य होतं. आता मात्र या सर्वावर बंदी का आलीये न कळे. की खरेच पुरुषाला अनेक व्यवधाने असल्याने या प्रमुख कारभारात पारंगत होण्याची त्याला आवश्यकता वाटत नाहीये. की हायब्रीड खाण्याने वा निकृष्ट फास्टफूड सेवन करण्याने त्याच्यातील ‘क्षमता’ कमी होत चाललीय? जरा विचार करता असे लक्षात येईल की त्या काळी एकटा पुरुष अनेक पत्नींना यशस्वीरीत्या सांभाळू शकत होता पण आजकाल त्याला एकाच बायकोला ‘सुखा’त ठेवता येत नाही, लग्नाच्या काही महिन्यांतच ती घटस्फोटाची भाषा करू लागते, यातून कोणता निष्कर्ष निघतो?
वृत्तपत्रे व मासिकांच्या (विशेषतः महिलांसाठीची मासिके) पानोपानी कामोत्तेजक गोळ्यांच्या, तेलाच्या अन् विविध लैंगिक आजारांवर मात करण्यासाठीच्या वाढलेल्या जाहिराती कशामुळे अवतरल्यात? काहीतरी समस्या निर्माण झालीय म्हणूनच ना? याला बळी पडणारे पुरुष खरोखरच यशस्वी ठरतात का? कारण अशा भोंदू वैद्यांकडे चोरीछिपेच जावे लागते. पाच-दहा हज्जाराला खड्डा बसतो. गुण कसा येईल? कारण तुम्हांला मूळचे शास्त्रीय ज्ञानच अवगत नाहीये, तुम्हांला कोणताही आजार नसून तुमची फक्त ‘भीड चेपली’ आहे. तुम्ही उगाचच या क्रियेला अश्लीलतेचे लेबल लावून अंधाऱ्या पोतडीत गुंडाळल्याने खऱ्या ज्ञानापासून तुम्ही वंचित राहिला आहात. मुख्य म्हणजे जिथे स्त्रीलाच आपले ‘शारीर’ नीटसे उमजलेले नसते, स्वतःचा ‘जी स्पॉट’ माहितीच नसतो तिथे पुरुषाला ‘आंधळा कारभार’ करीत राहणे क्रमप्राप्त ठरले आहे. आणि हेच आंधळं प्रेम करणं त्याच्या ‘मागासलेपणाचं’ अभिलक्षण म्हटलं पाहिजे. यावर मात करून जे सुशिक्षित झाले ते सर्वार्थाने सुखी झाले...

Monday, January 23, 2012
हस्ताक्षरातील अक्षर...
‘काही मान्यवर अन् प्रथितयश साहित्यिकांच्या हस्ताक्षरातलं एक अक्षर जरी कळत असेल तर शपथ.’ असे काही प्रकाशक आणि संपादक सदरहू साहित्यिकांच्या लिखाणाऐवजी ‘लेखना’वर टिप्पणी करताना जरूर बोलून जातात. याला काही माननीय अपवाद असतील, नाही असे नाही. तरीही यथातथा असलेल्या अक्षरातूनच ‘अक्षर’ वाङ्मय निपजते यात कुणाला शंका नसावी. हस्ताक्षर चांगले नाही वा संपादकांना वाचन सुलभ व्हावे म्हणून काही लेखक मंडळी चांगल्या हस्ताक्षराचे लिपिक पदरी बाळगून असत असेही ऐकिवात आहे. सुंदर विचार प्रसवणारे साहित्यिक अक्षरलेखनात मात्र कुडमुडे का? असा प्रश्न उपस्थित होण्याची दाट शक्यता आहे. मग हस्ताक्षरावरून व्यक्तीच्या भाव-भावनांचा मेळ घालण्याचे जे शास्त्र(?) आजकाल ठासून लिहिले जाते त्याविषयी शंका घ्यायला वाव आहे.
सहीवरून स्वभाव कळतो(?) म्हणतात. ज्यांना अंगठे मारणेच जमते त्यांचा स्वभाव दिलदार आहे की संकुचित? कसे ताडावे? साक्षरता अभियानामुळे तळागाळातील लोक साक्षर झाले. मात्र ते जे लिहितात त्यातील एक अक्षर तरी वाचता येईल का? अशी काही ठिकाणी परिस्थिती असतांना हस्ताक्षरावरून व्यक्तीच्या मनातील भाव, मानसिक बैठक, भावनांची आंदोलने नोंदविणे हा प्रकार कसा तकलादू कुबड्यांवर उभा केला गेलाय ते समजून येईल.
कालच (२३ जानेवारी) राष्ट्रीय हस्ताक्षर दिन (नॅशनल हँडरायटींग डे) साजरा झाला. ‘सुंदर हस्ताक्षर हा एक सुरेख दागिना आहे,’ हा सुविचार वाचता न येण्याच्या वयापासून ऐकावा लागतो. ज्यावेळी लिहायला सुरुवात होते त्यावेळी कुत्र्याचे पाय मांजराला होणे क्रमप्राप्त असते. धाकदपटशा दाखवून अक्षर सुधारते, सुधारावता येते. म्हणजे लहानग्यांनी जे ‘चितारलेय’ ते इतरांना ‘वाचण्या’योग्य होते. खरे तर वयाच्या तेराव्या चौदाव्या वर्षी वळणदार हस्ताक्षर शिकणे जाणीवपूर्वक सुरु होते. त्यानंतर मात्र स्वतःची विशिष्ट ‘लिखाण’शैली विकसित होते. चोविसाव्या वर्षी हे शिकणे पूर्ण होऊन हस्ताक्षरातून स्वत्व ठीबकू लागते. हँडरायटींगला ब्रेनरायटिंग समजण्याचा काळ या वयानंतरच सुरु होतो, असे म्हणतात.
परंतु मुख्य मुद्दा इथेच उपस्थित होतो की, या वयानंतर पेन कागद घेऊन एकाग्रतेने लिहितांना आजकाल कुणी आढळते का? टीव्ही, कॉम्प्युटर, मोबाईल, इंटरनेटच्या या वेगवान जमान्यात ही ‘उत्तम हस्ताक्षर’ नामक कला एका दूर कोपऱ्यात जाऊन पडली आहे की नाही? स्क्रीनवर लागतील इतक्या संख्येने इंग्रजी-मराठी फॉन्ट उपलब्ध असतांना आणि ते विनासायास पाहिजे त्या आकारात प्रकारात प्रिंट करता येण्याची सोय असतांना कोण पठ्ठ्या कागदावर सुंदर अक्षरांचे दागिने पेरीत बसेल? आता तर म्हणे प्रत्येक शाळा संगणकीय करणार आहेत. अकरावी-बारावीच्या मुलांना स्वस्तातले लॅपटॉप मिळणार आहेत. म्हणजे उद्याची कॉलेजियन्स खिशात पेन घेऊन मिरविण्याऐवजी संगणकच ठेवून मिरवतील हे आजही दिसतेच आहे. अशावेळी सुंदर हस्ताक्षर वगैरे प्रकार फारच गौण मानला जाईल. याबाबत दुमत नसावे. ज्याचे प्रेझेंटेशन उत्तम तोच उत्तम असेही एक नवे सूत्र आमलात येईल.
सद्याच्या पिढीकडे अॅन्ड्रॉईड लोडेड मोबाईल असतांना कोण महाभाग कागदांवर वा वहीत कधी ना कधीतरी ‘संपणाऱ्या’ पेनाने नोट्स लिहीत बसेल? मग हे ‘हस्ताक्षर सुधार’ वर्ग घेणे, हस्ताक्षरावरून व्यक्तीचा स्वभाव जाणून घेणे, अक्षरांच्या उंचीवरून- फर्राटे मारण्याच्या शैलीवरून मनातील आंदोलने समजावून घेणे याचे ‘शास्त्र’ नक्कीच कालबाह्य ठरणार हे निश्चित.
मामलेदार कचेरीत जाऊन पहा. तिथे अर्ज लिहून देणाऱ्या व्यक्तींची अक्षरे त्यांनाच कळत असतील की नाही देव जाणे. कुठल्याही सरकारी कचेरीत गेलात अन् फायली चाळल्या असता काय दिसेल? हो दिसेलच ते, वाचता येणे अशक्यच असते. शिफारस वा टिप्पणी लिहितांना वरिष्ठ साहेबच जिथे कंजुषी करतो तिथे इतर लिपिकांची सुंदर अक्षर काढण्याची काय मजाल? फार फार तर चौथी पाचवीची मुलेमुलीच तेवढी काहीतरी सुंदर लिहितांना (तेही शिक्षकांनी कम्पलसरी केलं असल्याने) दिसतील. अन्यथा सगळीकडे सुंदर हस्ताक्षरांची बोंबाबोंबच दिसते. असे असतांना आजच्या पिढीसाठी आउटडेटेड ठरणारी शैली गळी उतरविण्याचा गवगवा करून त्यासाठी रान उठवायचे काहीच कारण नाहीये.
आमच्यापैकी कितीतरी डॉक्टर प्रिस्क्रिप्शन लिहितांना अक्षरशः झोपा काढल्यासारखे लिहितात हे काही खोटे नाही. ते असे लिखाण असते की डॉक्टरपेक्षा तो केमिस्टच अतिहुशार म्हणावा की ज्याला ते औषध काय लिहिले असावे याचा अचूक ‘अंदाज’ लावता येतो. पण म्हणून काही डॉक्टरांच्या गिचमिड हस्ताक्षरावरून ते भणंग स्वभावाचे, विघ्नसंतोषी, गुन्हेगारी वृत्तीचे असतील असा कयास काढणारे शास्त्र ‘फसवे’ म्हणावे नाही तर काय? या पुष्ट्यर्थ अशी कितीतरी उदाहरणे देता येतील.
एकंदर काय तर लफ्फेदार सही ठोकणारा जितका लुच्चा असू शकतो तितका जोरकस अंगठा उठविणारा कदापी नसतोच असे नेहमी आढळून येते ते काही उगाच नाही. मग गलिच्छ हस्ताक्षरावरून एवढा गदारोळ उडविण्याचे काम का म्हणून करायचे? ज्याला जशी अक्षरे लिहायचीत तशी लिहू द्या, अक्षर चांगले‘च’ असावे असा अट्टहास का? प्रत्येकाने सुंदर अक्षर काढण्यासाठी जनजागृती व्हावी (जी कधी होऊ शकणार नाही) म्हणून हस्ताक्षरदिन साजरा करणे चुकीचेच ठरेल. नाही का?

Thursday, January 12, 2012
(हात) चोळीत चला!
काम फत्ते झालं नाही की हात चोळीत बसणं क्रमप्राप्त असतं. थंडीतही असंच होत असावं. त्याशिवाय का कोणी हात चोळीत जातात? (कुठे ते विचारू नका.) कडाक्याच्या थंडीत बंडीही अपुरी पडू लागल्यावर होळीची वाट पाहणे संयुक्तिक असते. होळी काय किंवा चोळी काय ही एक गरम नरम अफूची गोळीच ठरते. एकीने रंगता येतं, दुसरीसाठी रांगावं लागतं. होळी आल्याशिवाय ऊन पोळत नाही हा भाग योगायोगाने पुढे येतोच की. धगधगत्या होळीपुढे हात चोळून काय फायदा? तसाच हातावर हात चोळीत बसून होळीच्या रंगील्या गप्पा मारण्यातसुद्धा काय हशील? फार वेगळ्या अर्थाने सांगायचं तर हात चोळीत जाण्यापेक्षा तो भलत्याच ठिकाणी गेल्याची ‘हाळी’ ठोकण्यात काहीजण वाकबगार असतात. तर बात चोळीची चालली होती, होळीची नाही. पण एक साम्य लक्षात घेण्याजोगं- हात चोळीत बसला काय किंवा होळी पुढं धरला काय चांगलाच ‘शेकून’ निघतो हा बहुतेकांचा अनुभव असावा. कशाला तरी काहीतरी घासलं की वातावरण (अन् आवरणही!) गरम होणारच ठरलं. तर अशा घासाघीशीची वेळ येऊन ठेपली आहे बघा!
तर एक ‘आगाव’ पोरगी, (जिला नाव गाव नसते अशी आगाव!) जिचं सर्व काही चोळीत बसतं (मिळालेल्या नोटा, मोबाईल वगैरे...) उलटपक्षी इतरांना तशा चोळीची गरजच नाही इतकं ते दखल घेण्याजोगं नसतं अशा विरोधाभासित टंच, उंच अन् ‘पंच’ (इंग्रजीतला पंच, मराठीतलाही!) बसेल अशी उन्मत्ततेने ‘भार’लेली (ल्याली!) पोरगी ‘आबा’ला उद्देशून एका ‘उनाड’ (ऊन शब्दांच्या आड दडून!) गाण्यात म्हणते कशी- ‘वळखीनं वळख तुमीच काढली मुद्द्याचं बोलून थेट, अवो आबाऽऽऽ, जरा सरकून बसा की नीट, हात चोळीत चाललाय कुठं?’
डान्सबार बंदी लागू झाली असली तरी आमचे हे ‘रस’रसिक आबा त्यातले (मंत्रिमंडळातले) नाहीत बरं. हे ‘संत्री’मंडळातले! (मोसंबी-नारंगी(नार-रंगी) वगैरेतले!) पाठीवर गुद्दा देऊन नेमका मुद्दा ह्यांना वदवता येतो, मर्मावर बोट ठेवता येतं, कर्मानं जाणलेलं ‘वर्म’ ओठांवर आणता येतं. आणि इतका आटापिटा करुनही पदरात काहीच पडलं नाही तरी पदर’मोड’ करून हात चोळीत जाणं ह्यांचा हातखंडा धर्म! धर्मावरून आठवलं, तसं कर्मावरूनच असेल बहुतेक पण काहीतरी आठवलं हे काय थोडं आहे? तर आठवलं की ‘चंदनाची चोळी घातली तरी अंगांग पोळीत जाते’ असा कुठेतरी अध्यात्मातही (कान्हो वनमाळी वेगी भेटवा...?) उल्लेख आलेला आहे. विचार केला, चंदन तसं थंडक देणारं द्रव्य तरीपण अंगावर घेताच पोळत जातं म्हणजे काय?
तर तशी परिस्थिती आज आलेली आहे. इतकी ‘जाम’ (खोबरेल तेलाचाही जाम व्हावा इतकी) थंडी पडलीय की तिला उचलून अंगावर घेताच ती पोळू लागावी अशी मनीषा(इच्छा!) मनी(मनात) वस्ती करू पाहते आहे. कधी नव्हे तो पारा उतरलाय, तोंडाच्या वाफा बाहेर पडताहेत, आतली गर्मी नरम होऊन जातेय, दवबिंदूंचेच जिथे हिमकण होऊ लागले आहेत तिथे वेगळ्या बिंदूंचा टिकाव तरी लागेल का? अशा गुलाबी थंडीत (पहाटे) नऊ वाजेतो मल्मली (तारुण्याच्या म्हणा हवं तर!) रजईत खुसरपुसर करीत राहण्याचा योग रोज येवो असे काही ‘चोळी’बहाद्दरांना वाटले तर नवल ते कसले?
असा हा एकंदर गरमागरम मामला हात शेकून घेण्यास पुरेसा आहेसे कुणीही सांगेल. कारण चोळीत बसलं काय किंवा गेलं काय हातांना कोमट ते उष्ण करून घेता येणं सहजसाध्य आहे. मग वाट कसली बघता लेको, हाक किंवा हाळी फार फार तर होळी येण्याआधीच चोळीत चला...

Thursday, January 5, 2012
दी क्लिन (बोल्ड) पिक्चर!
त्या पिक्चरच्या नावात जरी ‘डर्टी’ शब्द मुद्दाम टाकला असला तरी एका सत्यकथेची ती क्लीन स्टोरी असून ती पाहतांना त्यातील बोल्ड सीन्स ओघानेच अंगावर येत राहतात व नेमकं फिल्म इंडस्ट्रीत असंच घडतं का? या मंथनात रंगलेला प्रेक्षकच अखेरीस क्लीनबोल्ड होऊन थिएटरच्या बाहेर येतो...
कथानक सर्वांना परिचित वाटावं असंच असलं तरी यशाच्या शिखरावर असतांना अल्पावधीत प्राप्त केलेलं ते भौतिकसुख कसं बोचू लागतं, कसा पलटवार करू पाहतं आणि एकदा जिंकलेला जुगार कसा लगेच हारावा लागतो याचं मोठं संयमी चित्रण करण्यात फिल्म यशस्वी ठरली आहे.
थोडक्यात ‘विषय’ असा फुलत जातो...
ती एक अल्लड मुलगी- रेश्मा. जराशी नटखटही. पिक्चरमध्ये काम करण्याचं वेड कोणाला नसतं? तिलाही ते लागलं होतं. ठरलेल्या लग्नाच्या आदल्या दिवशीच घरातून पळून ती शहरात येते. छोटं हॉटेल चालविणाऱ्या एका अम्माच्या आश्रयाला राहते. ती अम्मा रात्रीचीही कमाई करीत असते. तिच्याकडे गिऱ्हाईक आलं की दुसऱ्या रूममधून रेश्मा सित्काराचे आवाज काढीत त्यांचा रसभंग करते. यात तिला भारी मौज वाटत असते.
एका सकाळी रात्रीचा तो चाकरमानी येतो व थेट रेश्मालाच शीळ घालून जवळ बोलवतो. ‘काल रात्री तुला मजा आली असेल ना? आज रात्री मी येईन तू तयार रहा.’ या त्याच्या मागणीवर ती त्याची फिरकी घेते. त्याच्या चेहऱ्यावरून, अंगावरून बोटे फिरवते आणि त्याच्या डाव्या खिशातील शाईपेनाचे टोपण त्याच्याही नकळत काढते व म्हणते, ‘तुला काहीच जमत नाही असं अम्मा सांगत असते. बघ तुझी शाई कशी पटकन गळाली!’ तिचं खळाळून हसणं अन् त्याचा डाग लपवण्याचा प्रयत्न हे दोन्ही सीन प्रेक्षकांच्या मनाची एकदम पकड घेतात.
फिल्म मध्ये किमान डान्स तरी करायला मिळावा म्हणून कितीतरी इंटरव्हूसाठी रेश्मा जात राहते, प्रत्येकवेळी तिलाच डावललं जायचं. एकदा ती सिलेक्शन करणाऱ्याला भिडते. तो एक वाक्य तिच्या तोंडावर फेकतो- ‘अॅक्टर बनणे कुणालाही जमणार नाही, तू तर कोणत्याच दृष्टीने प्रेयसी वाटत नाही की नटी.’ ‘कशी वाटेल? मी चार दिवस हेलपाटे घालतेय, उपाशी आहे.’ या तिच्या खऱ्याखुऱ्या उत्तरावर तो तिला पाच रुपये देतो. ‘काहीतरी खा’ म्हणतो. हे अव्हेरणं जिव्हारी लागून ती आपले स्वप्न अर्धवट ठेवून परिस्थितीशी झगडू पाहते. जिथे खायचीच भ्रांत तिथे इतर गोष्टींची फक्त स्वप्नेच पाहायची. त्या मिळालेल्या पाच रुपयांत ती जाते तिच्या आवडत्या हिरोची- ‘सूर्या’ची फिल्म पाहायला. तिथे शेजारी बसलेला एक बुढ्ढा तिला वीस रुपयांत चिकटू पाहतो. ती त्याला धुडकावून लावते.
दुसऱ्या दिवशी पाच रुपये परत करायला ती पुन्हा त्या शुटींग चाललेल्या ठिकाणी जाते. त्या गाण्यात छातीवरचा पदर पाडून डान्स करायला कोणीही तयार होत नाहीत, तेव्हा ही तयार होते. मग एक डान्सर म्हणून तिला भाग्यानेच त्या गाण्यामध्ये छोटासा रोल मिळतो. दुनियेला स्त्रीकडून जे अपेक्षित आहे तेच ती त्या गाण्यात करते परंतु इब्राहीम नामक ‘शुद्ध’च सीन घेणारा डायरेक्टर इतरांनी शूट केलेले नेमके तेच गाणे कापून टाकतो. त्यामुळे पिक्चर साफ आपटतो. ती व अम्मा तिचा पिक्चरमधील डान्स पाहण्यास थिएटर मध्ये जातात परंतु पिक्चर संपेपर्यंत काही तिच्यावर शूट केलेलं गाणं लागतच नाही. दोघीही हिरमुसल्या होऊन परततात.
नंतर निर्माता तेच तिचं गाणं घेऊन पुन्हा तोच पिक्चर रिलीज करतो तर पब्लिक डोक्यावर घेतं. तिचा एक चाहता ती फिल्म फक्त तिच्या एका गाण्यासाठी ब्लॅक तिकीट घेऊन पाहू इच्छितो, तेव्हा ब्लॅक करणारा म्हणतो, ‘शंभर रुपयांत तर ती आख्खी भेटेल तुला.’ तो आशिक तिचा शोध घेत तिच्या घरी जातो. पण तिचे गाणे कापून टाकल्यामुळे ती चिडलेली असते. त्याचे भलतेच इरादे स्पष्ट झाल्याने ती त्याला घालवून देते. पण जाता जाता तो तिला ओरडून सांगतो, ‘तुमचा डान्स खूप सेक्सी झालाय.’ मग तिच्या लक्षात येतं की आपलं गाणं पुन्हा घेतलं गेलंय.
संस्कृतीरक्षक पेपरांतून हे गाणं म्हणजे पिक्चरवर एक धब्बा आहे असं परीक्षण नोंदवितात. हे परीक्षण वाचून होते उलटेच केवळ त्याच गाण्यासाठी तुफान गर्दीत पिक्चर चालतो. फक्त आपल्यासाठी लोक ती फिल्म पाहताहेत हे लक्षात आल्याने ती आनंदून जाते.
शेवटी तो निर्माता तिचा पत्ता शोधीत तिच्या घरी जातो. तिला घर ना दार. भुकेल्या तिला तो भरपेट खाऊ घालतो. तिथेच तिचं नामकरण करतो- ‘सिल्क’ आणि तिला घेऊन फिल्म इंडस्ट्री गाठतो. ‘सूर्या’ नामक प्रथितयश हिरोला ही नवी हिरोईन काही पटत नाही. तो तिला भाव देत नाही. हीन लेखतो. ती जाणते पुरुषाला काय हवं असतं ते. ती त्याच्या मेकअप रूममध्ये जाते. ‘तुमचीच बनून राहीन, तुम्ही म्हणाल ते करीन’ म्हणते. तो म्हणतो, ‘तू मासिके वाचत नाहीस वाटतं? मी तब्बल पाचशे हिरोइन्स बरोबर ट्युनिंग करून राहिलो आहे, असं मॅगॅझीनमध्ये छापून येत असतं.’ यावर सिल्कच उत्तर असं- ‘पण एकाच हिरोईनसोबत पाचशेवेळा ट्युनिंग झालेलं नसेल ना?’ तिच्या हजरजबाबीपणामुळे तो चकित होतो. त्यालाही ‘तेच’ हवं असतं आणि तो तिला सांभाळून घेत शॉट पूर्ण करतो. त्या पिक्चरमधील फक्त तेच गाणं पहायला पब्लिक येतं व गाणं संपताच जल्लोष करीत निघून जातं. सिल्कला पक्कं उमजतं पब्लिक ‘कशाचं’ वेडं आहे. मग ती त्याच दृष्टीने काम करायचं ठरवते. ती सूर्याकडे जाऊन आणखी काम देण्याविषयी विनवते. त्यावर त्याचा प्रश्न येतो- ‘मी का म्हणून तुला आणखी ब्रेक देऊ?’ त्यावर ती त्याला पुन्हा चारशे नव्व्याण्णवची याद करून देते आणि तो तयार होतो. त्याच वेळी इब्राहीम एक नवी फिल्मची बोलणी करायला तिथे येतो. म्हणतो ‘या फिल्ममध्ये एक उत्तम रोल तुम्हांला करावा लागेल सूर्यकांतजी. ज्यासाठी अशा बेशर्म नटीची अजिबात जरुरी भासणार नाही.’ ते ऐकून सिल्क बाहेर जाते. तो तिला तिचा अपमान वाटतो. पण सूर्या सारखा सुपरस्टारही इब्राहीमला सुनावतो- ‘पब्लिकला मसाला पाहिजे असतो मसाला. तुझ्या फिल्म्समध्ये मसालाच नसल्याने त्या अळणी होऊन आपटतात. फार फार तर एखाद्या फिल्मफेस्टिव्हल मध्ये अशा फिल्म वाहवा मिळवतील. पण थिएटर मध्ये नाही.’ यावर तो ऐकत नाही. ‘मी माझ्या पद्धतीनेच फिल्म डिरेक्ट करणार. मी सिल्कसोबत काम करू इच्छित नाही.’ असं सांगून निघतो. दारातच सिल्क त्याला अडवते. ‘मला पिक्चरमध्ये न घेण्याचं कारण काय?’ असं विचारते. तो तिला समजावून सांगू पाहतो. ‘फिल्म केवळ तुझ्यासारख्या आयटम गर्लमुळे चालत नसतात हे मी सिद्धच करून दाखवेन,’ असं चॅलेंज तिला देतो. त्यावर तिचं उत्तर असतं- ‘फिल्म फक्त तीनच गोष्टींवर चालते एन्टरटेनमेंट, एन्टरटेनमेंट, एन्टरटेनमेंट. आणि मी स्वतः एक एन्टरटेनमेंट आहे.’ इब्राहीम मुलखाचा स्त्री सौंदर्य द्वेष्टा असतो. त्यामुळे तो तिचं मनावर न घेता निघून जातो. इकडे सूर्या सिल्कला दररोज कितीतरी फिल्म्समध्ये आयटमसाँगसाठी ब्रेक देऊन दर रात्री मात्र स्वतःचं इप्सित साध्य करण्यात मश्गुल असतो...
एकदा तिची कव्हरस्टोरी करायला नामांकित मासिकाचा फोटोग्राफर सिल्कच्या घरी येणार असतो. तेव्हा तिच्या घरी काहीच नसते. ना बसायला खुर्ची ना टेबल. मग ती एक शक्कल लढवते. फोटोग्राफर घरात शिरतो अन् पाहतो तर काय सिल्क टबबाथ घेत असते. तो जाऊ माघारी लागतो. ती थोपवते. ‘घे फोटो’ म्हणते. तो विचारतो, ‘पण अंगावर काही कपडा आहे की नाही?’ ती म्हणते- ‘तुम्ही अंघोळ काय कपड्यांनिशी करता? नाही ना? तर मग घ्या फोटो. कपडे घालून अंघोळ करणे चिटींग आहे. अन् मी काहीही लपवून न ठेवता सर्व काही देण्याचं ठरवलं आहे.’ फ्रंटपेजवर सिल्कचा टबबाथमधील फोटो छापून येतो. त्याच मासिकासाठी सूर्याचे घेतलेले फोटो छापले जात नाहीत म्हणून तो चिडलेला असतो पण तसे तिला दाखवत नाही. तिचा रातोरात उपभोग घेतच राहतो. अल्पावधीतच सिल्क सेक्सीडान्सर म्हणून सुपरस्टार होते. तिच्या आयटम साँगशिवाय पिक्चर तयारच होत नसतात. लोकही तिला डोक्यावर घेऊन नाचतात. ती जिथे जाईल तिथे चावट पब्लिक लोटांगण घेत असतं. तिने थोड्याकालावधीतच ड्रीमगर्ल म्हणून मोठी झेप घेतलेली असते.
रेसकोर्सवर सिल्क जाते तेव्हा सूर्या तिला टाळू पाहतो. ‘इथे चांगल्या घराण्यातले, सुशिक्षित लोक येत असतात. माझ्या बायकोला कळले तर गहजब होईल. तू रात्री फार्महाउसवर भेट.’ म्हणतो. तरीही ती प्रवेश करतेच. तिथे तिला रमाकांत भेटतो. त्याच्या घोड्यावर कुणीच पैज लावत नसतात पण ती लावते. पैज सुरु होण्यापूर्वी ती घोड्याच्या कानामध्ये काहीतरी गुणगुणते आणि तो घोडा चक्क जिंकतो! तिला आकाशही ठेंगणे वाटते.
त्या रात्री सूर्याच्या फार्म हाऊसवर ते दोघे रंगात आलेले असतांनाच सूर्याची पत्नी टपकते. तो सिल्कला लपण्यास सांगतो. ती बाथरूममध्ये लपते अन् तो त्याच्या पत्नीशी रत होतांना पाहते. हा तिच्यावर आघात असतो. ज्याला सर्वकाही देऊ केले तो असा छबीछैल निघेल, दोन्ही दगडांवर हात ठेवणारा असेल असं तिला कधी वाटलं नव्हतं. तो केवळ तिला उपभोगण्यासाठी प्रेमाचं नाटक करीत असतो. ज्या पद्धतीने तो तिला ओरडून लपून राहायला सांगतो त्यावरून त्याची नियत तिला कळून चुकते आणि प्रत्यक्ष जेव्हा तिच्यासमोरच तो पत्नीला कवेत घेत जातो तेव्हा तर पुरुष जातीवरचा तिचा विश्वासच उडून जातो. इतका की सकाळी तिला घरी पोचवू का म्हणणारा रमाकांतही आपल्याला ‘वापरून’ घेणार असाच तिचा ग्रह झालेला असतो. त्याने गाडीचे गिअर बदलतांना आपल्या मांड्यांना स्पर्श का केला नाही याचे तिला आश्चर्य वाटते. ती तसे बोलूनही दाखवते- ‘तूही माझ्यावर रेप करणार आहेस ना?’ असं बेधडक बोलते. त्यावर तो विचारतो, ‘तुम्ही नेहमी असं उलटा विचार का करताहात?’ त्यावर ती म्हणते, ‘कारण दुनिया सरळ वागत नाही म्हणून.’ तिला त्याच्याबद्दल संशय वाटू लागत असतो पण त्याच्याशी बोलतांना तिला खरे प्रेम जाणवू लागते. तो स्टोरी रायटर असतो अन् त्यात सूर्याचा भाऊ. ती त्याला तिच्या गावाकडच्या घरी सोड म्हणते. ते दोघे तिच्या घरी जातात. तेव्हा तिची आई तिला घरात घेत नाही. तिच्या तोंडावर दार आपटते. ती जे अश्लील चाळ्यांचे नाचकाम फिल्म्समधून करीत असते ते तिच्या आईला कसे पटेल?
सूर्याने तिला ‘वापरून’ टाकलेले असते तर आई घरात घेत नसते. पुरुषी वासनेची केवळ शिकार झालेली ती सूर्याला टाळू लागते. अशातच तिला त्या वर्षीचा उत्कृष्ट फिल्मपुरस्कार जाहीर केला जातो. तिचे नाव ऐकून प्रेक्षकांमध्ये बसलेला इब्राहीम निराश होतो. ‘भलत्याच लोकांना भलतेच लोक भलत्याच कामासाठी मनाचा पुरस्कार देऊन प्रेक्षकांचा अपमान करताहेत’ असं पुटपुटतो आणि ते खरेच असते. सूर्याला ती अलिकडे भेटत नसते. त्यामुळे त्यानेच तिच्यासाठी पुरस्कार देऊ केलेला असतो. पुरस्कार देतांना तो तिच्याशी कुजबुजत म्हणतो, ‘तुला वाटत असेल तू खूप उंचीवर पोचलीयेस परंतु लोक जाणतात की खरं काय आहे ते. तू एक डर्टी सिक्रेट आहेस.’
तिला आता त्याच्या मनातलं साफ समजलेलं असतं. मग ती आपल्या मनातली खदखद स्टेजवर मोकळी करून टाकते. ‘मी आज इथे उभी आहे ती एक सेक्सी, अश्लील, डर्टी काम करणारी नर्तिका म्हणून. मी जरी मन लावून काम केलं असलं तरी तुम्हांला जे हवं ते माझ्याकडून करवून घेतलं गेलंय. माझे कष्ट कोणाला दिसले नाहीत. केवळ सेक्सी आयटमगर्ल म्हणून माझ्याकडे बोट दाखवलं जातं. कुटुंबासहित माझे पिक्चर पाहू शकता येत नाहीत असे आरोप करणारे तुम्ही चोरून चोरून माझ्या फिल्म्स पाहून कोणतं सुशील कुटुंब घडवता आहात? मी जास्त बोलणार नाही कारण माझ्याव्यतिरिक्त येथे सगळेच सज्जन लोक उपस्थित आहेत. तुम्ही मला मानाचा पुरस्कार देता खरं पण मला दूरही लोटता, पेपरांतून विरोधी लिहिता. हा कुठला न्याय? तुम्ही पुरस्कार द्या अथवा मला शिव्या घाला मी माझे डर्टी पिक्चर करीत राहणार, लोकांना माझे उत्तान काम पाहायलाच लावणार.’ ती निघते तेव्हा फक्त एकच व्यक्ती टाळ्या वाजवून दाद देते ती म्हणजे सिल्कबद्दल सडेतोड लिहिणारी लेखिका- नयना.
एका सेटवर सूर्याच्या पत्नीशी तिची गाठ पडते. ती तिला सांगते की आपल्या दोघींत खूप फरक आहे. सिल्क म्हणते ‘नाही. फक्त एका तिळभराचा फरक आहे. एक तीळ जो माझ्या छातीवर आहे आणि एक तीळ तू जिथे बसतेस (सूर्याच्या अंगावर) तिथे आहे.’ ती चमकतेच. काय समजायचे ते समजते व फुरंगटून जाते.
सूर्याशी फारकत घेतल्यावर सिल्क त्याचा भाऊ रमाकांतला आपला सोबती करते. तो विचारतो ‘रेस जिंकण्यापूर्वी तू घोड्याला काय कानमंत्र दिलास?’ ती नेजामिच्या शैलीत हसते. म्हणते- ‘मी त्याला माझ्या पायाकडे पाहू नकोस म्हटलं वरती पहा लोकं जिंकून घेता येतात.’ तो तिचं सौंदर्य पाहतच राहतो. त्या दोघांची झालेली जवळीक नयनामुळे पेपर आउट व्हायला वेळ लागत नाही. रमाकांत नाराज होऊन सिल्कला काय छापून आलेय ते सांगतो. म्हणतो ‘तुला द्रोपदी म्हणून हिणवलंय.’ ते ऐकून ती चिडते. सगळे मॅगॅझीन्स जाळते आणि त्या नयनाला धडाच शिकवायचा म्हणून तिच्या बंगल्यावर जाते. तर तिला प्रवेश दिला जात नाही. भेटू दिले जात नाही. आत महत्वाची पार्टी चालू असल्याचे सांगण्यात येते. मग सिल्क भर रस्त्यात तिच्या गाडीच्या बोनेटवर सेक्सी डान्स करीत ट्राफिक अडवते. लोक बेभान होऊन नाचत राहतात. नयना गॅलरीत उभे राहून तिचा नंगानाच पाहते व पोलिसांना फोन करते. नेमकी त्या गर्दीतच सूर्याची गाडी अडकते. रमाकांत खाली उतरून सिल्कला रोखायला जातो. तर सर्वांसमक्ष ती त्याला किस करते. म्हणते, ‘मी नयनाची पार्टी खराब करायला आले होते आता दुसऱ्या पार्टीचाही (सूर्या) बोजवारा उडवला.’ ती नकळत रमाकांतकडे खेचली जाते. ते दोघे एकत्र येतात. त्यांचं प्रेम फुलू लागतं.
इकडे सूर्या शकिला नामक नव्या हिरोईनला घेऊन फिल्म काढणार असतो. तर सिल्ककडून इतर डायरेक्टरांच्या त्याच त्या अश्लील काम करण्याच्या अपेक्षा असतात. त्यात तिचं लक्ष लागत नाही. सारखं सारखं तेच ते करून ती कंटाळलेली असते. त्यामुळे तिचं डायरेक्टरशी भांडण होतं. पूर्वी ती कधीतरी ड्रिंक घ्यायची आता सारखीच घेऊ लागते. कधीतरी सिगर ओढणारी चेनस्मोकर होते. अशावेळी तिला आधाराची गरज असतांना रमाकांतही येऊ शकत नाही. कारण तो नव्या फिल्मच्या मुहूर्ताच्या पूजेमध्ये व्यग्र असतो. सूर्या तिला आगामी फिल्म मध्ये घेण्यास नकार देतो. म्हणतो, ‘आपण सिल्कचे काम हिरोईन कडून करून घेऊ. लोक फक्त दुकानातला माल पाहतात, दुकान नाही.’ फिल्मच्या पाहिल्या टेकच्या पार्टीला रमाकांत सिल्कची ओळख आपल्या आई-वडिलांशी करून द्यायला तिला बोलवतो. तो तिला ‘सभ्यपणे वाग’ असे सांगतो खरे परंतु सिल्कला डावलून फिल्ममध्ये घेतलेल्या शकीलाची व तिची खडाजंगी होते. कोण श्रेष्ठ यावर दंगा होतो. सिल्क तिला पायात पाय घालून पाडते. पार्टीचा सत्यानाश होतो. सिल्क तरातरा निघून जाते. रमाकांत तिला थोपवू पाहतो पण सूर्या त्याला अडवतो. म्हणतो, ‘तिला जाऊ दे. ती तुझ्या लायकीची नाहीच. सिल्कसारख्या पोरी फक्त शय्यासुखासाठीच ठीक असतात.’ तरीही तो तिला सोडवायला जातो. ‘फक्त काही तासांसाठी तुला गप्प राहायला काय झालं होतं? तू का तमाशा केलास? माझे आई वडील तुला काय समजत असतील? डर्टी?’ तो तिला विचारतो. यावर ती म्हणते ‘मी आहेच डर्टी. ज्या कामामुळे मी प्रकाशझोतात आले ते मी का विसरू? मी अशीच राहणार. असंच वागणार.’ तो विचारतो, ‘म्हणजे तू बदलणार नाहीस तर? आयुष्यभर अशीच डर्टी कामे करणार?’ तिचा ठामपणे आलेला होकार ऐकून तो सुनावतो, ‘तरी सूर्या म्हणतच होता, तू घरी आणण्याच्या लायकीची नाहीयेस.’ त्यावर ती उसळून विचारते. ‘मग फक्त शय्यासोबतीसाठीच हवी असते की काय मी तुम्हांला?’ ती त्याच्या गाडीतून मध्येच उतरते. तो निघून जातांना ती कारच्या मागच्या काचेवर जोरात दगड मारते.
तिने स्टेजवर दिलेल्या जाहीर कबुलीमुळे तिला कामे मिळेनाशी होतात. अनेक डायरेक्टर तिची जी मलीन प्रतिमा जनसामान्यांत तयार झालेली आहे, त्या इमेजला घाबरून आपल्या फिल्ममध्ये घेण्यास असमर्थता दर्शवितात. ती व्यसनांच्या आहारी जाते. सिगारेट आणि दारू तिच्या जीवनाचे अविभाज्य अंग बनतात. मग ती एक आव्हान पेलण्याचं ठरवते. आपली सर्व कमाई पणाला लावून सगळा पैसा ओतून सिल्कचा ट्रिपल रोल असलेली फिल्म बनवते. तिला इब्राहिमच्या फिल्मला शह द्यायचा असतो. ज्या फिल्मची स्टोरी रमाकांतने लिहिलेली असते. परंतु उलटंच होतं. लोक इब्राहिमच्या फिल्मला कौल देतात. सिल्कचं तेच ते नागडं ‘काम’ त्यांना अजिबात पटलेलं नसतं. तिच्या त्या सेक्सी भूमिकांचं प्रेक्षकांना अजीर्ण होतं. कारण आता ती पाहिल्या सारखी चवळीची शेंग नसते. दारू पिऊन अन् सिगारी ओढून तिचा ‘चौकोन’ झालेला असतो. पब्लिक फक्त माल पाहतात, तो त्यांच्या पसंतीस न उतरल्याने तिची फिल्म डूबते.
ती एकटीच नशापाण्यात गर्क होऊन सागराच्या लाटा मोजीत असते. तिथे तिला मुद्दामहून इब्राहीम भेटायला येतो. ‘तुझी हार झाल्याचा जश्न करण्यासाठी आलोय’ म्हणतो. ती म्हणते, ‘तू काहीही म्हण परंतु तू मला चाहतोस.’ तिच्या या वाक्यावर त्याचे मंथन चालू होते. खरेच ही मला दोस्त म्हणून नव्हे तर दुश्मन म्हणून आवडते का? आणि विचारचक्रात गुंतून तो तिच्या घरी जातो. ‘ड्रिंक दे’ म्हणतो. ती तिचे जुने फोटोज दाखवते. बोलताबोलता त्याला असं जाणवतं की खरोखर आपण हिच्या प्रेमात आलो आहोत. ती रात्र ते एकत्र घालवतात.
त्यानंतर तिला घराच्या जप्तीसाठी फोन येऊ लागतात. कर्जबाजारी झालेल्या सिल्कला ‘आठवडाभरात पैसे दिले नाहीत तर घर खाली करावे लागेल’ असा फोन आल्यावर तिला एक सटरफटर डायरेक्टर आठवतो. त्याने त्याचे व्हिजिटिंग कार्ड रमाकांतच्या पार्टीत दिलेले असते. एखादा फिल्मरोल मिळेल, कर्जही फेडता येईल या आशेने ती त्या पत्त्यावर जाते. पण तिथे भयंकर शुटींग चाललेले असते. अश्लील फिल्म्स बनविल्या जात असतात. खूप पैशांचं आमिष दाखवून व तिला अंमलीपदार्थ पदार्थ पाजून विवस्त्र शुटींग करण्याचा प्रयत्न त्यांनी चालविलेला असतो. तिला शुद्धच नसते. इतक्यात पोलिसांची तिथे रेड पडते व सर्वांना पळ काढावा लागतो. तिला लाथाडत सगळे धूम ठोकतात. नशेत असल्याने ती भरकटते. वेडी होते, आपली खरी ओळख तिला पटत नाही. आपण सिल्क की रेश्मा? हे द्वंद्व तिला सहन होत नाही. ती आणखीनच व्यसनाधीन होते. आठ दिवसांत ती कोठून पैसे आणणार? तिची मानसिक स्थिती पूर्ण बिघडून जाते, नैराश्येच्या गर्तेत ती सापडते.
एव्हाना इम्रान तिच्या आईला शोधून आणतो. तिची आईच तिला या परिस्थितीतून बाहेर काढील असा त्याचा अंदाज असतो. तो सारखा सिल्कला फोन लावत राहतो परंतु ती नशेत तर्र असल्याने सिल्क फोन घेऊ शकत नाही. अखेर एकदाच फोन उचलते. इम्रान म्हणतो, ‘किती फोन लावतोय तू उचलत का नाहीस?’ ती म्हणते, ‘माझा नाद सोड आता. एखादी चांगली मुलगी गाठ.’ पुढे तो सांगतो, ‘तुला एक बेस्ट सरप्राईज देणार आहे.’ ती विचारते, ‘मला तुझ्या पुढील फिल्ममध्ये घेणार का?’ तो म्हणतो ‘नाही त्याहूनही मोठं सरप्राईज आहे.’ ती म्हणते ‘ये मग लगेच.’ तो म्हणतो ‘आता शक्य नाही. मी एका बोअरिंग पार्टीत अडकलोय.’ ती विचारते ‘कोण कोण आहेत?’ तो सगळ्यांची नावे सांगतो. सूर्यकांत, रमाकांत इ. इ. ती म्हणते ‘त्या सर्वांना माझ्यातर्फे बाय बाय सांग.’ तो विचारतो ‘कुठे जाणार आहेस?’ ‘झोप येतीये खूप. सकाळी ये.’ असं उत्तर देऊन ती फोन ठेवते. ती काय म्हणाली ते तो इतरांना सांगतो. त्यावेळी सूर्या म्हणतो, ‘बरोबर आहे. तिनं बाय बाय केलेलंच चांगलं आहे आता. नाहीतरी तिच्याकरिता इथे या जगात राहिलेलं आहे तरी काय?’ हे ऐकून इम्रानच्या डोक्यात प्रकाश पडतो. तो धावत सिल्कच्या घरी जातो... पण...
पण ती त्याच्यासाठी थांबणार नसते. आपला सिल्कचा मेकअप उतरवून रेश्माच्या मूळ चेहऱ्यासह झोपेच्या गोळ्यांची अर्धी-पाऊण डबी खाऊन ती कायमची निजलेली असते...
प्रथमच इम्रान हाश्मीला टोकाची साजूक भूमिका देऊन यथास्थित स्थापित करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. त्यामुळे त्याला त्याच्या रंगेल इमेजमधून बाहेर येण्यास मदत होईल. दाक्षिणात्य प्रथितयश हिरो म्हणून नसरुद्दिन शाहला पुन्हा ‘मिर्च मसाल्या’सारखा मसाला चाखण्याचा रोल देऊन भलतेच भडक दाखविले गेले आहे. तुषार कपूरचा अभिनय उत्तम असून बरीच सुधारणा झाल्याचे जाणवते. खरा कस तर विद्या बालनचा लागला आहे अन् तिने अगदी जीव तोडून रेश्मा व सिल्कच्या व्यक्तिरेखा साकार केलेल्या आहेत. व्यसनाधीन झाल्यावर केलेली अॅक्टिंग दाद देण्याजोगी. यशोशिखरावर असतांना बेफिकीरपणे वागणं, बिनधास्त बोलणं अन् प्रसंगी कुणाच्याही गळ्यात पडणं हे तिनं परिणामकारकपणे दाखवलं आहे. पिक्चरचा शेवट मध्यंतरानंतरच कळून येत जातो पण मध्येच दोन गाणी घुसडल्याने वेगवान कथानकाला खीळ बसते. ‘उलाला उलाला’ हे गाणं ठेका धरायला लावतं, सिल्कच्या कालखंडाची आठवण करून देणारं असलं तरी श्रवणीय झालं आहे. मात्र चित्रपटाच्या सुरुवातीलाच धुम्रपान व मद्यपान शरीरास हानिकारक आहे असा वैधानिक इशारा देऊन पिक्चरची प्रत्येक चौकट सिगारेटी फुंकण्यात अन् बाटल्या रिचवण्याकामी वापरली गेली आहे.
बाकी मग क्लीन स्टोरी पाहायची असेल तर थोडंफार डर्टी होऊन गेलं तर बिघडत नाही. त्यातूनही आपण चांगलं ते शिकत जातो. तेच शिकण्यासाठी एकदा तरी हा पिक्चर पाहावा. (फक्त प्रौढांनीच!)

Subscribe to:
Posts (Atom)